आज बऱ्याच दिवसांनी लेखणी (इथे keyboard ) हाती घेतली. निमित्त झाले "fathers day" चे.लोकसत्ता च्या रविवार पुरवणी मधले अनेक लेख वाचताना मुक्ता बर्वे चा लेख समोर आला आणि अचानक मी आणि बाबा मला दिसू लागलो.
गेल्या 28 वर्षांत मला दिसलेली बाबांची वेगवेगळी रुप kaliedoscope प्रमाणे डोळ्यासमोर तरळू लागली. अगदी लहानपणी शाळेसाठी उठवणारे बाबा..भराभर अंघोळ वैगरे आटपून uniform घालून तयार करणारे बाबा..तेव्हाची एक आठवणारी गम्मत म्हणजे पहिलीत गेल्यावर आता कडेवर चा हट्ट नाही हं ..चालायचं असा आई चा प्रेमळ दम असायचा. त्यामुळे आई ला अच्छा करून ती नजरेआड झाली की मी बाबांसमोर हात पसरायचे आणि मग बाबा मला हसत कडेवर घ्यायचे ते अगदी शाळा येईपर्यंत.
त्या नंतरही आयुष्याच्या प्रत्येक नवीन वाटेवर, वळणावर त्यांच्या कवेत असल्याचा feel कायम असतो. सतत आम्ही नवीन अनुभव घ्यावेत आमच्या कक्षा कायम विस्ताराव्यात याकडे त्यांच नेहमीच लक्ष असायचं. मग शाळेत असताना swimming शिकण्याचा आग्रह असो किंवा 18 वर्षे पूर्ण झाल्यावर गाडी शिकवण्याचा उत्साह असो. मला आठवतंय college मध्ये गेल्यावर माझा एक छोटा group झाला होता आणि आमची रोजची फिरायची जागा हि ठरलेली असे पण आपल्या road च्या पुढेही मोठ जग आहे..ते स्वतः जाऊन बघा फक्त इथेच वेळ दवडू नका असा सांगून त्यांनी मला CST , fashion street , Linking road , मंत्रालय वैगरे फिरून यायला सांगितलं होतं.
सतत काहीतरी करत राहणं हे बहुदा त्यांच्यासाठी relaxation असाव :) नुसत बसलेल मी त्यांना कधीच पाहिलं नाही. वेगवेगळ्या विषयांवरच त्यांच वाचन, मोकळ्या स्वभावामुळे तयार झालेल्या आणि जपलेल्या त्यांच्या प्रचंड ओळखी, घरातल्या सगळ्या गोष्टीत उत्साहाने झोकून द्यायची त्यांची वृत्ती, त्यांच्या personality बद्दल खूप काही सांगून जाते.घरी असताना प्रत्येक गोष्टीत स्वतःच्या हाताने मदत करणारे बाबा आणि office मधले बाबा यात जमीन अस्मानाचा फरक असतो.घरी ते फक्त आमचे बाबा असतात. त्यांनी त्यांच्या कामाचा ताण कधी घरी आणलेला माझ्या आठवणीत नाही.आज जेव्हा मी स्वतः job करते तेव्हा हे कित्ती कठीण आहे याचा अंदाज येतो आणि इतकी वर्षे त्यांच्या कामातले तणाव आम्हाला कधीच कसे जाणवू दिले नाहीत याच आश्चर्यही !
बाबा नेहमीच शांत आणि हसरे. घरी आलेल्या प्रत्येकाचा व्यवस्थित पाहुणचार व्हावा यासाठी छोट्याछोट्या गोष्टी ते स्वतः करतात , कुणाला काही कमी पडू नये यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात आणि अस्वछपणा आणि ओंगळपणा जराही खपवून घेत नाहीत. त्यांच्याशी काही बोलताना कधीच दडपण जाणवत नाही कि awkward वाटत नाही. उलट घडणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी share करावी असच वाटत. याला कारण म्हणजे त्यांचा सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा positive approach आणि अगदी adverse situation सुद्धा अतिशय खंबीरपणे आणि शांतपणे हाताळण्याची त्यांची सहज कला.
बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणत होते पण मूड च लागत नव्हता. आज मात्र सगळे लेख वाचून एकदम मूड बनला आणि keyboard घेऊन च बसले. बाबा जसे आहात तस्सेच कायम राहा.. हसरे, बडबडे, उत्साही आणि एकदम fit :)