About Me

My photo
I love to live the life king size! I am aesthetic by nature and love to try out new things. I love to travel, love to eat, love to celebrate :) I believe there is so much to learn from every moment and every person you come across in life. Just keep your mind open :)

Thursday, September 2, 2010

ऐक स्त्री जन्मा तुझी कहाणी..

कसं असतं नाही आमचं असं जगणं,
मुलीच्या जन्माचं कोंदणच वेगळं.
कोंदणात बसतो एकच हिरा,
मात्र सांभाळाव्या लागतात नाना त-हा.
मिळतात नवी नाती वयाच्या पंचविशी नंतर,
जुळवून घ्यायला शिकावं हेच बेहत्तर.
दोन घरांचं जरी भाग्य तिला लाभतं,
मन मात्र दोन्हीकडे अडकलेलं राहतं.
तिचं मन म्हणजे जणू द्विदली वाल,
आत दले दोन पण वरून एकच साल.
पाहाणा-याला वाटावे वा काय झालयं एकरुप,
डोकावलं कि कळतं आतलं खर बहुरुप.
लग्नानंतर तो होतो तिच्या मनाचा राजा,
बदलत राहते ती स्वत:ला न करता गाजावाजा.
कुणाची काय आवड तर कुणाची सवय काय,
लक्षात ठेउन सारं अंथरुण पाहून पसरते पाय.
अपेक्षा असतात तिच्या ब-याच पण खास अशी एकाचकडून,
त्याच्याशिवाय मनातली ताजी फ़ुलही जातात गळून.
वाटतं बदलावं कि त्यानेही जरा बायकोसाठी,
करावं काही फ़क्त आपल्यासाठी.
कधी करावं बायको बायको कधी कौतुक जमान्यात,
आयुष्याचं सार्थक होतं बसं त्या चार शब्दात.
काही न बदलल्याचा त्याला वाटे अभिमान फ़ार,
कुणामुळे झालं शक्य याचा करावा विचार थोडाफ़ार.
’त्या’ ची एकदा झाल्यावर आयुष्याचे बदलतात क्रम,
बाकी सारे नंतर येतात तो असतो प्रथम.
त्याचे मात्र तसे नसते तो राहतो दोन्हीकडे,
इथे आणतो तो पण गिरवावे लागतात आपल्यालाच धडे.
बाहेर पडताना आधी विचार करी घरच्यांचा,
अपराधीपणा डोळ्यात जणू काही चूक केल्याचा.
होते मग अतिव दु:ख वाटते अगदी परके,
इतके कठीण का जाते यांना जर आम्ही सोडून येतो सगळे.
करावं लागतं सगळं शेवटी आपल्यालाच,
कितीही राग आला तरी बाईपण लागतं जपायलाच.

5 comments:

  1. khup sundar, shabdapurna aani bhavnatmak manogat vatle. striche sampurna aayushya kyat tiplele disle.

    ReplyDelete
  2. aprateem...i can picturise the future me...

    ReplyDelete
  3. आज जरी ५० % आरक्षण झालं,स्री खूप शिकली , मोठ्या पदावर गेली (राजकारणातहि) तरी तुम्ही वर्णिलेले आयुष्यच ती जगत आहे ! धन्यवाद अश्या सुंदर शब्दात आणि प्रत्येकाला विचार करायला भाग पडेल अश्या भावनेत ,आपल्या सर्वांची व्यथा मांडलीत याबद्दल !

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyavad Geetanjali. Ajun hi aplya ithe kami jast pramanat hich stithi ahe. Pan mala watta jar stree ch aatun ajun strong zali tar chitra badlel.

      Delete